🕒 1 min read
पुणे- नव्या कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी काल भाजपा किसान मोर्चातर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आयोजित केलेल्या वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर यात्रा कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
शेतकऱ्यांना कोठेही आपला शेतीमाल विकता यावा यासाठी मनमोहन सिंग सरकारने कायद्याचे प्रारूप तयार केले होते. या बाबत नेमलेल्या राज्यांच्या समितीचा तेंव्हाच पणन मंत्री म्हणून मी प्रमुख होतो. आता मात्र काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी या कायद्यांना विरोध करत असल्याचं सांगत कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या कायद्याच्या विरोधात राजकीय हेतूंनी सुरु असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भाजपाने शेतकरी संपर्क मोहीम सुरु केली आहे. सामान्य शेतकरी या कायद्याविरोधातील अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.दरम्यान, याप्रसंगी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे , यात्रेचे संयोजक , किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेवनाना काळे , आ . राहुल कुल , भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की , मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र यामुळे बाजार समित्यांवरील अवलंबून असणाऱ्या अनेक हितसंबंधी मंडळींचे अर्थकारण बिघडणार आहे. म्हणून या कायद्याविरोधात ओरड सुरु झाली आहे. या कायद्याचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने शेतकरी संपर्क मोहीम हाती घेतली आहे. शिवार संवाद सारख्या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना या कायद्याचे फायदे समजावून सांगितले जातील.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- जाणून घ्या राज्यात कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी झाली का ?
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
