Share

मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

मुंबई : राज्यात बार,हॉटेल्स,सार्वजनिक वाहतूक,मॉल्स सुरु आहेत मात्र राज्यात प्रार्थनास्थळे बंद असल्याचे चित्र आहे. आज राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिर तसेच नागपूरातील साई मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.दरम्यान मंदिरं खुली करण्यासाठी या आधीसुद्धा भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला होता. मात्र ठाकरे सरकराने त्याचे फारसे गांभीर्य घेतले नव्हते. त्यानंतर पुन्हा आता आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या आत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला असून, पोलीसांनी प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना ताब्यात घेतले आहे. तसेच राज्यपालांनीसुद्धा मंदिर बंद असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!