Share

उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते. आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची केलेली कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांची तब्येत चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरच दैनंदिन कार्य सुरु करतील. आरोग्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान,इकडे राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आढळून आली आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातच आता शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. त्यांनी वर्षावर बोलवलेली आजची बैठक रद्द केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!