🕒 1 min read
मुंबई: १९७८ चा सत्यम शिवम सुंदरम चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटात शशी कपूर आणि झीनत अमान यांची जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटासाठी गायिका लता मंगेशकर यांना राज कपूर यांची पहिली पसंती होती. याबाबत यतींद्र मिश्र यांच्या ‘लता सुर गाथा’ या पुस्तकात लता मंगेशकर यांनी हा खुलासा केला होता.
“राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाची कथा मला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली होती. यातील आवाजच संपूर्ण पटकथेचा भाग होता. पण मला हे योग्य नाही वाटले म्हणून मी त्यांना चित्रपट बनवण्यास नाही थांबवले पण, मी माझी इच्छा नसल्याचे त्यांना बोलून दाखवले. त्यानंतर अभिनेत्री जीनत अमान यांना ‘रूपा’ नावाचे पात्र मिळाले.”, असे लता मंगेशकर यांनी म्हटले होते.
‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात शशी कपूरयांनी (राजीव) तर जीनत अमान यांनी ‘रूपा’ नावाचे पात्र साकारले होते. या चित्रपटातील ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे गीतही लता मंगेशकर यांनी गायले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पू.ल. देशपांडे लतादीदींबद्दल एकदा म्हणाले होते, ‘या आकशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि…’
- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले-नाना पटोले
- ‘असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला’ : सुधीर मुनगंटीवार
- लता दीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
- हॉलीवूडमध्ये दिसली होती लतादीदींच्या गाण्याची झलक; ‘या’ चित्रपटात वाजली होती गाणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
