मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्र पोरकं झालं आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यामुळेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (BLJ MLA Sudhir Mungantiwar) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. लता मंगेशकर यांनी गायन क्षेत्रात केलेला संघर्ष अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांनी त्यांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घातली, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाल, त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न, निःशब्द झाले. त्यांच्या या दीर्घ गान प्रवासात त्यांचे सूर कधी अंगाई झाले, कधी तरुणाईचा आवाज झाला, अलवार प्रेमाचे प्रतीक झाला, या स्वर्गीय सुरांनी अनेकांचे भावविश्व समृद्ध केले. ये मेरे वतन के लोगो अशी आर्त हाक भारतीयांना देत मंगेशकर यांनी शहीदांच्या बलिदानाची गाथा मांडली. मेरी आवाज ही पहचान है असे म्हणणाऱ्या दीदी त्यांच्या असंख्य गीतातुन आमच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
हॉलीवूडमध्ये दिसली होती लतादीदींच्या गाण्याची झलक; ‘या’ चित्रपटात वाजली होती गाणी
Lata Mangeshkar Biography: ‘नाचू या गडे…’ या मराठी गाण्याने झाली लता मंगेशकरांच्या करिअरला सुरुवात
Lata Mangeshkar : ‘हेमा’ची झाली ‘लता’, जाणून घ्या लतादीदींच्या आयुष्यातील कहानी
Lata Mangeshkar Biography : वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी झाली होती लता मंगेशकरांच्या करिअरला सुरुवात
“…दो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिये”, गाण कोकिळेचा आवाज हरपला


