🕒 1 min read
मुंबई : गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सहा दशकांपेक्षा अधिक काळ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादिदींची दोन गाणी हॉलीवूड चित्रपटातही वाजली आहेत. लता मंगेशकर यांची दोन गाणी ‘तेरे संग प्यार में’ (नागिन) आणि ‘वादा ना तोड’ (दिल तुझको दिया) हॉलिवूड चित्रपट जिम कॅरी आणि केट विन्सलेट अभिनीत इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंडमध्ये वाजली आहेत.
आज त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी पोरकी झाली आहे. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली. आज ‘दो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिये…’ असं दिदी सर्वांनाच पोरकं करून गेल्या.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
