Share

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर ; प्रकृतीत सुधारणा, भाची रचना शहाने दिली माहिती

Published On: 

मुंबई : गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे, भाची रचना शाह यांनी सांगितले. सध्या लता मंगेशकर यांना ऑक्सिजन सपोर्टवर (oxygen support) ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान रचना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी यांना कोविड (COVID-19) ची सौम्य लक्षणे आहेत. मात्र त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.

सध्या त्या बऱ्या होत असल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना तिला भेटू दिले जात नाही. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे आता त्यांना दहा-बारा दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे. कोरोनावर विजय मिळवून त्या लवकरच बऱ्या होऊन घरी परतेल असे सांगत रचना शाह पुढे म्हणाल्या, लता जी एक लढाऊ आणि विजेत्या आहेत. मी देशभरातील सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी प्रार्थने केली आहे. ९२ वर्षीय लतादीदी यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!