Share

लता मंगेशकर यांचं क्रिकेट बरोबर होत वेगळच नातं..

Published On: 

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईमधील ब्रीच कॅंडी रुग्णालयात न्यूमोनियाने निधन झाले. भारतीय संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला. लता दीदी या गायना बरोबरच इतर क्षेत्रात पण रुची दाखवत असत. त्यांचा  संगीत क्षेत्रापलीकडे पण दांडगा जनसंपर्क होता. राजकीय नेत्यांपैकी राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे इत्यादी व अश्या अनेक नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचा संबंध होता. तर क्रीडा क्षेत्रात, खासकरून क्रिकेट या खेळात त्या विशेष रस दाखवत. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर अशे अनेक क्रिकेट वीरांशी त्यांचे जवळचे नाते होते.

क्रिकेट खेळाचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि लता दीदी यांचे तर आई- मुल असे अत्यंत जवळचे नाते होते. त्यांनी एकदा सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर या दोघांबरोबर आयपीएलचा अंतिम सामना देखील पहिला होता. २०१८ च्या आयपीएलचा सीएसके विरुद्ध हैद्राबाद सनरायझर्स हा अंतिम सामना त्यांनी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या परिवाराबरोबर त्यांच्या घरी पहिला होता. सचिनच्या सांगण्यावरून त्यांनी एकदा भर कार्यक्रमात तू जहाँ जहाँ रहेगा, मेरा साया साथ होगा… हे गाणं देखील गायलं होत. २

०१८ च्या आयपीएलचा सीएसके विरुद्ध हैद्राबाद सनरायझर्स हा अंतिम सामना झाल्याच्या पुढच्या दिवशी त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती कि, ” आज बऱ्याच दिवसांनी तेंडुलकर कुटुंब माझ्या घरी आल होत. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मी अश्या तिघांनी कालचा सीएसके विरुद्ध हैद्राबाद सनरायझर्स माझ्या घरी बघितला  आणि मला सचिनशी क्रिकेट विषयावर गप्पा मारून खूप बरं देखील वाटलं. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली बरोबरचा फोटो देखील शेअर केला होता.

भारतातील या दोन महान दिग्गज लोकांना एकत्र बघून भारतातील अनेक लोकांना अत्यानंद झाला होता. त्यांची भारतीय क्रिकेट संघाशी निगडीत अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे लता मंगेशकर यांनी १९८३ च्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाकरीता एक खास लाईव्ह शो देखील केला होता आणि या शो मधून जमा झालेली २० लाखांची रक्कम त्यांनी १९८३ च्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाला भेट म्हणून दिली.

         महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!