🕒 1 min read
मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले, असे शोकसंदेशात सुप्रिया म्हणल्या आहेत.
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
सुप्रिया सुळे यांनी शोकसंदेश ट्विट केला आहे. त्यात त्या म्हणतात, ‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.’
‘भारतीयांच्या भावविश्वात अढळस्थान मिळविलेल्या ‘गानकोकिळा’ अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लतादिदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्या बऱ्या होऊन परत येतील असा विश्वास होता. पण नियतीला हे मान्य नव्हते.’
‘लतादिदींनी प्रदिर्घ काळ पार्श्वगायन केले. अनेक अजरामर गीते त्यांनी गायली आहेत. ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ हे त्यांनी गायलेले गीत त्यांची ओळख सांगण्यास पुरेसे आहे. त्यांना भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळाले. भारतीयांचे अलोट प्रेम लाभलेल्या लतादिदी यांच्या निधनामुळे भारताचा एक अनमोल ठेवा हरपला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
