जालना : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मार्गास अगोदर प्राधान्य असणार असल्याचे म्हटले आहे. जालना रेल्वेस्थानकाजवळ तयार करण्यात येणाऱ्या ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर या अहवालाचे सादरीकरण झालेले आहे. परंतु या प्राथमिक सादरीकरणात काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्याने आता येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दुसरे सादरीकरण होणार असल्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान बुलेट ट्रेनमुळे मुंबईपासून औरंगाबादचा प्रवास दीड तासात होईल. तर जालन्यापर्यंतचा प्रवास पाऊणे दोन तासात होणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे सात मोठे प्रकल्प देशात होणार असून त्यामध्ये आठवा प्रकल्प म्हणून या मार्गाचा समावेश करण्यात येणार आहे. तर फक्त रेल्वे वाहतुकीसाठी दिल्ली ते मुंबईतील जेएनपीटी दरम्यान मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग टाकण्यात येणार असून हा प्रकल्प ५० हजार कोटी रुपये खर्चाचा असणार आहे. अशी माहिती मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना

