मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यावर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे आहे.
यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटु फारुख इंजिनियर यांनी तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजाराच्या जागी सुर्यकुमार यादवला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले,’अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल दुमत नाहीच. पण सुर्यकुमार हा टीमसाठी खुप मोठा हुकमी खेळाडू ठरु शकतो. अक्रमक खेळाडू असल्याने तो वेगवान धावा जमवून संघाचा विजय सोपा करु शकतो.’ असे म्हणत त्यांनी सुर्यकुमारला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.
मालिकेतील तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात रविंद्र जडेजाच्या जागी आर अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण लॉर्ड्स कसोटीत रहाणे आणि पुजाराने मोक्याच्या क्षणी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांना संघाबाहेर करण्याचा निर्णय कर्णधार कोहलीला घेणे अवघड असणार आहे.
महत्त्वाच्याा बातम्या
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
- भावा-बहिणीच्या अतूट नात्याची शंभरी; बारामतीतील या जोडीची होतेय चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

