पुणे : बैलगाडा शर्यतीवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार या शर्यतीवरून एकमेकांकडे बोट करत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मेळावे घेतले जात आहेत. या दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यात बैलगाडा शर्यत भरवत राजकीय धुरळा उडवून दिला. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह ४१ जणांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा मालकांवर विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गुन्हे मागे घेतले जातात म्हणून कोणी कायदा हातात घेऊ नये. कायदा, सुव्यवस्था व शांतता टिकवण्याचे काम सर्वांनी करावे. या पुढच्या काळात नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटलांनी केली आहे.
दरम्यान आता या घोषणेनंतर बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घोषणेनंतर नुकताच दिलीप वळसे पाटील यांचा पारगाव या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बैलगाडा मालक आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी या पुढच्या काळात कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘माझ्या दृष्टिकोनातून कायद्याची थोडेफार आकलन मला आहे. सुप्रीम कोर्टातला हा तिढा सुटल्याशिवाय काहीही करता येणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. याशिवाय राज्य शासनाचे अॅडव्होकेट जनरल यांना बोलावून घेतो. आपण सर्व त्यांना आपली मते सांगू आणि ही केस कशी लवकर बोर्डावर येईल ते पाहू. त्याशिवाय यावर योग्य तो निर्णय करून घ्यायचा प्रयत्न करू’ असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
- भावा-बहिणीच्या अतूट नात्याची शंभरी; बारामतीतील या जोडीची होतेय चर्चा
- ‘अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांना सोडवा’ ; श्रीलंकेचे भारताला साकडे


