औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गंगापूरच्या तहसीलदार सरिका शिंदे यांना मंगळवारी (दि.१०) घेराव घालण्यात आला. श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान वाटपातील गलथान कारभाराच्या विरोधात घेराव घालण्यात आला. दोन दिवसांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास १३ ऑगस्टपासून तहसील कार्यालयावर बेमुदत आंदोलनाचा इशाराही शेतमजूर युनियन व भाकपच्या वतीने देण्यात आला.
श्रावणबाळ, संजयगांधी, निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झालेल्या तसेच शिधा पत्रिका असूनही नागरिकांना शिधा का मिळत नाही यासंदर्भात २६ जुलै रोजी तहसील कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी तहसीलदार सारिका शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी तहसीलदार यांनी या खात्याच्या कर्मचाऱ्यास बोलावून, वंचित लाभार्थ्यांची यादी माझ्याकडे जमा करा मी चौकशी करून कार्यवाही करते असे आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या निषेध करण्यात आला.
यावेळी तहसीलदार सारिका शिंदे यांनी लाभार्थ्यांची यादी स्वीकारून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच जे शिधा दुकानदार शिधापत्रिका असूनही शिधा देत नाही अशा दुकानदाराचे नाव व पत्ता मला द्या असे सांगितले. यावेळी लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ .प्रा.राम बाहेती यांनी तहसीलदार व शिष्टमंडळासह चर्चा केली. यावेळी लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ गणेश कसबे,भाकप वाळूज सचिव कॉ. इब्राहिम पटेल, सह सचिव रतन आंबिलवादे आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

