Share

पुण्याच्या डॉक्टर तरुणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केले ट्वीट, म्हणाली…

Published On: 

पुणे : मी सिव्हील हॉस्पिटलमधील इंटर्न आहे. आम्ही डॉक्टर म्हणून 5 मार्चला शपथ घेतली. चार दिवसातच पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली अन् 11 मार्चपासून आमची ड्युटी सुरु झाली. आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवलंय याची मला व माझ्या सहकाऱ्यांना कल्पनाही नव्हती. मात्र महाराष्ट्रातील पहिला कोरोनाग्रस्त सापडून 15 दिवस झाले, तरी पुण्यात इंटर्न डॉक्टरांसाठी पुरेसे मास्क, सँनिटायझर उपलब्ध नाहीत, असा दावा पुण्याच्या डॉक्टर तरुणीने ट्वीटरवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून डॉ. श्वेता यांनी केले आहेत.

डॉ. श्वेता यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे की, ‘कोरोना संशयित रुग्णांसाठी सिव्हीलमध्ये विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला गेला. इथल्या संशयित रुग्णांचं sampling चं काम इंटर्नकडेच असतं. मात्र डॉक्टरांना लागणारे सर्जिकल मास्क, सँनिटायझर यांचा तुटवडा आहे, किंवा N95 मास्क्स अजूनही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीतही कोणीही काम टाळलं नाही.

तसेच, कोरोना स्क्रीनिंग, थर्मल टेस्ट आम्ही करतो, संशयितांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारतो; मात्र हे करत असताना आमच्या स्वसुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची कमरता आहे. त्याचप्रमाणे आज जेव्हा आपण स्टेज 3 मध्ये जात आहोत, तेव्हा आपली वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज हवी आहे. सैनिकांजवळ लढण्यासाठी ढालच नसतील तर युद्ध जिंकणार कसं? कोरोना विरुद्ध PPE कीट आमची ढाल आहे. ते नाही तर किमान N95 मास्क, सँनिटायझर पुरेसे उपलब्ध व्हावेत ही माफक अपेक्षा डॉ. श्वेता यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनासाठी isolation wards वाढवण्याची गरज आहे. व्हेंटीलेटरची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आपत्कालीन परिस्थितीत चांगलं नेतृत्व करत असून आमचे आधारस्तंभ आहेत. तरी आमचे हे मूलभूत प्रश्न आपण सोडवाल अशी तमाम डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला अपेक्षा आहे आणि तरच या कोरोना नावाच्या शत्रूशी आपण यशस्वीपणे लढू शकू, असा विश्वासही डॉ. श्वेता यांना वाटतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!