जालना: कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत असुन सर्वसामान्य लस ही संजीवनी समजल्या जात आहे. सर्वत्र लसीकरण जोरात करण्यासाठी केंद्राने फ्रंट लाईन वर्कर आणि वृध्दांना लस देत आहे परंतु गेल्या काही दिवसापासून जालनात लसीचा तुटवडा भासत असल्याने एकीकडे कोरोनाचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने लसीकरणावर अधिक जोर दिला आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिक येत असुन त्यांना पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध नसल्याने त्यांना तसेच परतावे लागत आहे.
एकीकडे कोरोना रुग्ण वाढत आहे त्यातच केंद्रावर लसीचा साठाची कमतरता जाणवत आहे. जिल्ह्यात ११३ केंद्र सुरू होते तर उपलब्ध असलेल्या डोसेसमुळे आज ३६ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. बहुतांश केंद्रावर आज बंदचे फलक लागले आहे. आता १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचे काय? असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. जालना जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध होण्यासाठी जालन्यांचे पालकमंत्री व अरोग्या मंत्री राजेश टोपे यांना या संधर्भात विचारले असता लवकरच लसीचा साठा उपलब्ध होईल.नविन डोस उपलब्ध केव्हा होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या कोविशिल्डच्या १२९०० डोसेसपैकी ११ हजार डोसेस संपले असून उर्वरीत डोसेस आज शुक्रवारी ३६ केंद्रांवर देण्यात येत आहे. सध्या जालना जिल्ह्यात उपलब्ध असलेले कोविशिल्डचे १८०० तर कोवॅक्सीनचे दोन हजार डोसेस आज शुक्रवारी विविध केंद्रावर दिले जात आहे. हे डोसेस आज संपण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी आता मोठी गर्दी होत असून लोकप्रतिनिधींकडूनही लसीकरणासाठी मागणी वाढल्याने चार ते पाच दिवस लसीकरण सुरू रहावे म्हणून जिल्ह्याला कोविशिल्डचे ५० हजार तर कोवॅक्सीनचे २० हजार डोसेस मिळाल्यास लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवता येईल.
- ‘या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत’ ; शोएब अख्तरने भारतीयांसाठी मागितली अल्लाहकडे दुवा
- संबंधित रूग्णालयांना रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे लागणार; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

