खुलताबाद : तालुक्यातील शासकीय रुग्णालयात तसेच कोरोना सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अनेक रूग्णांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवावे लागत आहे. यात खुलताबाद तालुक्यातील कोरोनामुळे आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. खुलताबाद येथे तत्काळ तज्ज्ञ व एम. डी. डॉक्टरसह कोविड सेंटर उभारण्यासाठी राजकियांसह प्रशासनाने पुढाकार घेऊन खुलताबाद तालुक्यातील कोविड सेंटर उभारणीचा विषय तत्काळ मार्गी लावावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खुलताबाद तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३१० जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर दुसर्या लाटेत ७२६ जण बाधित झाले आहेत. पहिल्या व दुसर्या लाटेत असे एकूण १ हजार ३६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झालेली असून यात पहिल्या लाटेत १६ तर दुसर्या लाटेत २८ असे तालुक्यातील ४४ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे. खुलताबाद येथील कोरोना सेंटरमध्ये ४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
यासह ज्याना कोरोनाचे लक्षणे दिसून येत नाही. परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत, असे ४९ रूग्ण असून होम क्वारंटाइन होऊन घरातच उपचार घेत आहेत. यासह खुलताबाद तालुक्यातील २५ रूग्ण औरंगाबाद येथील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. खुलताबाद तालुक्यात असे एकूण ११६ रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात काही ठिकाणी कोरोना रूग्ण आढळून येत असले तरी नागरिक व व्यापारी यांच्या सहकार्याने ही संख्या घटली आहे. तालुक्यातील अनेक दुकानदारानी आपली दुकाने बंद ठेवल्या आहेत. यासह तालुक्यात नियमित कोरोना चाचणी सुरू असून तोंडाला मास्क लावणे, सुरक्षीत अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, विनाकारण घरा बाहेर न पडणे अशा प्रकारचे कोरोना विषयक नियम पाळून नागरिक आपला बचाव करताना दिसून येत असल्याने तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या घटतांना दिसून येत आहे.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णाला जास्त प्रमाणात त्रास होणे, ऑक्सिजन पातळी खालावणे यासह कोरोना चाचणी तपासणी किंवा इतर उपचारासाठी ग्रामीण भागातून १५ ते १८ टक्के लोक हे औरंगाबाद शहरासह खुलताबाद शहरातील रूग्णालयात उपचारासाठी जात आहेत. तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टर व रेमडिसिवीर उपलब्ध नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना चांगले उपचार मिळवण्यासाठी औरंगाबाद घाटी किंवा शासकीय सामान्य रूग्णालयात जावे लागत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध आणखीन कडक! लग्न करा पण फक्त १५ जणांच्या उपस्थितीत, ते ही मंडपाविना!
- लसीसाठी इतर राज्यांनी चेक दिले, महाराष्ट्र कधी देणार? ; दरेकारांचा सरकारला सवाल
- उघड्या घरावर चोरट्यांचा डल्ला, दागिन्यांसह ३३ हजारांची रोकड लंपास
- सिल्लोडमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढवा, कम्युनिस्ट पक्षांची मागणी
- खबरदार! मेडिकलमधून चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास होणार कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

