🕒 1 min read
औरंंगाबाद : मुलगा घराबाहेर वॉकींगला गेल्यावर त्यामागे गेलेल्या मुलीला आणण्यासाठी सून गेल्याचे पाहून चोराने कपाटातील साडेआठ तोळ्यांचे दागिने आणि ३३ हजाराची रोकड लांबवल्याची घटना २७ एप्रिल रोजी सिडको, एन-६ मधील संभाजी कॉलनीत रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेत कार्यरत असलेले सुधीर भानुदास खताळ (वय ५२) यांचा मुलगा २७ एप्रिल रोजी रात्री वॉकींगसाठी घराबाहेर पडला होता. त्याच्या मागोमाग मुलगी देखील धावत गेल्यामुळे तिला माघारी आणण्यासाठी खताळ यांची सून घराचा दरवाजा उघडा ठेऊन गेली. तेवढ्यात घरात शिरलेल्या चोराने स्वयंपाक खोलीसमोर असलेल्या रुममधील कपाटाची चावी घेतली.
नंतर त्यातील साडेआठ तोळ्यांचे दागिने आणि ३३ हजाराची रोकड लांबवली. घरी परतल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. मात्र, गुरुवारी खताळ यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार एकनाथ चव्हाण करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
