सिल्लोड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह शहरातील परिस्थिती भयानक झालेली आहे. ग्रामीण भागात तर रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिल्लोड शहरात यामुळे भितीचे वातावरण तयार झाले अाहे. कोरोना माहामारीला थांबण्यासाठी शासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. राज्य शासनाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांप्रमाणे जिल्हा व स्थनिक प्रशासनाने देखील यात लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना लसीकरण सुरु आहे. मात्र शहरात एकमेव लसीकरण केंद्र असल्याने येथे गर्दी होत असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केंद्र वाढवावे अशी मागणी कम्युनिस्ट संघटनांनी केली आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला रोखण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना व निर्णय घेतल्याने काही प्रमाणात रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनाने शहरात लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करावी या बाबत कम्युनिस्ट संघटनांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालय या एकाच ठिकाणी लस दिली जात असल्याने लस घेणाऱ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होतांना दिसत आहे. लस घेणाऱ्यांची गर्दी होत असल्याने एकप्रकारे कोरोना संक्रमणाला आमंत्रित करण्यासारखे आहे.
अशा घटनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आणखी वाढला आहेत. हा धोका टाळण्यासाठी वयोगट तयार करून लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. अशी मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशन, अखिल भारतीय किसान सभा व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन सिल्लोड तालुका व शहर शाखेच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित सरदेसाई यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खबरदार! मेडिकलमधून चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास होणार कारवाई
- औरंगाबादच्या खाम नदी पुनरुज्जीवन अभियानात आदित्य ठाकरेंना ‘विशेष रस’
- गुजरातनंतर आता देशभरात कोरोना रुग्णांसाठी बदलला हा नियम
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करणार ; मुख्यमंत्र्यांचा ॲक्शन प्लॅन
- ठाकरे सरकारच्या ‘या’ महत्त्वपूर्ण योजनेत एमआयएम खा.जलील यांचे विशेष लक्ष!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

