Share

भाजपाचे कार्यकर्ते राज्यात नव्या जोमाने व्यापक सेवाकार्य करतील; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Published On: 

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना कोरोनाच्या संकटात देशवासियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले असून त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे राज्यातील कार्यकर्ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या जोमाने अधिक व्यापक सेवाकार्य करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मोठे सेवाकार्य केले होते. शहरी आणि ग्रामीण भागात सर्वत्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत केली होती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सेवाकार्याची योजना पक्षाच्या पदाधिकारी – लोकप्रतिनिधींच्या ऑनलाईन बैठकीत नुकतीच निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आता हे सेवाकार्य अधिक जोमाने आणि व्यापक करण्यात येईल.

त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य निर्बंध पाळले जावेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध सोसायट्या – गल्ल्यांमध्ये युवकांनी ‘कोविड अनुशासन कमिट्या’ बनवाव्यात अशी महत्त्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या स्थानिक समित्या बनवून लोकांना मदत करण्यासाठी पक्षाचा युवा मोर्चा पुढाकार घेईल व अत्यंत प्रभावी कार्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संकटावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो याचा नेमका उपाय सांगितला आणि जनतेला धीर दिला. आर्थिक चक्र चालू ठेऊन लोकांची रोजीरोटी वाचवायची आणि त्याचवेळी कोरोनावर मात करायची याचा मार्ग त्यांनी दाखविला. त्या मार्गाने देश यशस्वी होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी सामना केला. त्याच पद्धतीने दुसऱ्या लाटेचाही सामना करू, असा विश्वास  प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!