Share

अखेर सनराईझर्स हैद्राबादला सूर गवसला; पंजाब किंग्सला नमवत मिळवला विजय !

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आज आयपीएलमध्ये डबल हेडरची रंगत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, यातील पहिला सामना संपला असून सनराईझर्स हैद्राबादने अखेर खातं उघडलं आहे.

चेपॉकमधील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादच्या गोलंदाजांनी केलेल्या कमालीमुळे हा विजय अधिक सहजतेने मिळवता आला आहे. पंजाबचा कर्णधार के एल राहुल, मयांक अग्रवाल, क्रिस गेल अशी दमदार फलंदाजांची रांग असताना हैद्राबादच्या गोलंदाजांमुळे केवळ १२० धावांची मजल पंजाबला मारता आली.

यानंतर, सनराईझर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर बेयरस्टोने फलंदाजीची दमदार सुरुवात केली. वॉर्नर ३७ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. मात्र, बेयरस्टोला या मोसमात पहिलाच सामना खेळणाऱ्या केन विलियमन्सन ने पाठींबा दिल्यामुळे हैद्राबादने सहजतेणे हा विजय मिळवला. बेयरस्टो ने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकून ५६ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. दरम्यान, आता पंजाबचा संघ तळाला गेला असून पहिल्या विजयासह हैद्राबादने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!