औरंगाबाद : ‘आम्ही आयुष्यभर प्रशासनाची सेवा केली, आता आयूष्याच्या उतरत्या काळात आम्हाला आनंदाने जगू द्या, आमच्या हक्काची पेन्शन वेळेवर मिळू द्या’ अशी आर्त विनवणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व पेन्शनर्स यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. एप्रिल महिन्याची २२ तारीख उजाडली तरीदेखील मार्च महिन्याची पेन्शन त्यांच्या पदरी पडलेली नाही. ‘दर महिन्याच्या १ तारखेला मिळाली नाही दिली तरी चालले किमान ५ तारखेपर्यंत तरी हक्काची पेन्शन आम्हाला देत जा’ अशी विनवणी या ज्येष्ठांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांच्याकडे केलेल्या या विनंतीत पेन्शनर्स असोसिएशनमार्फत ज्येष्ठ नागरिकांनी आपली कैफियत मांडली आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सेवानिवृत्तांना २२ एप्रिल उजाडला तरीदेखील मार्च महिन्याहे निवृत्तीवेतन प्राप्त झालेले नाही. कधी बजेटच नसते तर कधी पगारबिलाच्या फायली अधिकारी यांचे टेबलावर केवळ सहीसाठी बरीच दिवस पडून असतात. गेल्या दोन वर्षापासून हा विलंब सुरु असल्याचे असोसिएशनने म्हंटले आहे. ‘एक तारखेला आमची पेन्शन करा, आमचा तसा आग्रहदेखील नाही, किमान महिन्याच्या पाच तारखेआत तरी हक्काची पेन्शन हातात पडू द्या असा आग्रह त्यांनी केला आहे. प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले जात नाही. अनेकवेळा फोनदेखील उचलले जात नसल्याची खंत असोसिएशनने व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिक्षण अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांच्याकडून निवृत्ती वेतन देयके वेळेवर वित्त विभागामध्ये दाखल केली जात नाहीत. वित्त विभागातून एक किंवा दोन दिवसात बिल दाखल झाल्यानंतर आरटीजीएस केले जाते असे वित्त व लेखाधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी म्हंटले आहे. तर याप्रकरणी लक्ष घालून समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदवले यांनी दिले आहे.
उतरणीला आलेले पेन्शनर्स
सर्व पेन्शनर्स आयुष्यभर जिल्हा परिषदेत सेवा दिल्यानंतर आता आयुष्याच्या उतरणीला लागलेले आहेत. ते कर्मचारी आता वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक झाले आहेत. अनेकांच्या सोबतीला अनेक व्याधीही जडल्या आहेत. त्यात कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठीदेखील या ज्येष्ठांची धडपड सुरु आहे. काही घरात पतिपत्नी दोघेही आजारी आहेत. अशाप्रसंगी हातात पैसा असणे अत्यन्त गरजेचे आहे. मात्र हक्काची पेन्शन उशिराने होत असल्याने या वृद्धांची अत्यन्त तारांबळ होत आहे. गेल्या दोन वर्षात काही पेन्शनर्सचा मृत्यूही झालेला आहे. जन्माला आला तो मरणारच आहे मात्र, अशा पद्धतीने होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्चीकरण हे जिवंतपणीच मरणाचा अनुभव देणारे असल्याची करुण भावना या ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. कृपया आम्हा वयोवृद्ध पेन्शनर्सना तरसवू नका, आमची हक्काची पेन्शन वेळेत हातात द्या, अशी आर्त विनंतीही त्यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाचा विसर !
विभागीय आयुक्तांनी या दोन वर्षात दोनवेळा जिल्हा परिषद प्रशासनाला पेन्शनर्सचे निवृत्तीवेतन वेळेवर करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशाचा जिल्हा परिषद प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. हा त्यांच्या आदेशाचा अवमान केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस, विकास बाविस्कर यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

