Share

‘इंडियन आयडल’ शोविषयी कुमार सानू यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या शोची चर्च होत असते. या शोमुळे अनेक लोक संताप व्यक्त करत असल्याचेही दिसत आहे. आता या शो विषयी कुमार सानू यांनी वक्तव्य केले आहे.

https://www.instagram.com/tv/CQbf0xRBAB3/?utm_source=ig_web_copy_link

कुमार सानू यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्हाला असे वाटते का या शोमध्ये टॅलेंटला प्रोत्साहन दिले जाते? त्यावर उत्तर देत कुमार सानू म्हणाला की, ‘जितकी जास्त चर्चा होणारा, तितका जास्त टीआरपी वाढणार हे लक्षात घ्या. टॅलेंट असेल तर योग्य मार्ग मिळतोच आणि या शोच्या माध्यमातून अनेक टॅलेंटेड गायक इंडस्ट्रीला मिळाले आहेत.’

पुढे ते म्हणाले, ‘इंडियन आयडलच नाही तर सर्वच शो असे असतात. स्पर्धकांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. असे होऊ शकते की त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. पण या मंचामुळे त्यांना काही काम मिळाले आणि पैसा कमावण्याची संधी मिळू शकते’, त्यांची उत्तरामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

याआधी या शोमधील पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल खोटा असल्याचे समोर आले होते. तसेच या शो मधील दोन स्पर्धकांना बाहेर काढण्याची देखील मागणी करण्यात आली होती.असे एक ना अनेक या शोचे किस्से समोर येत असल्याने हा शो टीआरपीसाठी पुढे काय काय करतील सांगता येत नाही असे देखील बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!