मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटात तिने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. अनेकांनी तिचे या भूमिकेसाठी कौतुक केले आहे. सोशल मीडियावर क्रितीचे अनेक ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसतात.
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना क्रितीने ओम राऊतसोबत फोटो शेअर केले.ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे. हे फोटो तिने ट्विटरवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की,’विश्वास बसत नाही की, हा प्रवास इतक्या लवकर संपला आहे. मला जानकी बनवण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी की, मी ते ओझे आणि जबाबदारी हाताळू शकते. त्याबद्दल खूप आभार.’ तिने पुढे लिहिले की, ‘तुमचे विजयन खूप दूरगामी आहे. हा एक चित्रपट आणि एक असे चरित्र आहे, ज्याचा मला नेहमीच अभिमान असेल.’ त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CUuk80ho8i7/?utm_medium=copy_link
नुकतेच क्रितीने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या शूट दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर राडा घालत आहेत. दरम्यान अभिनेता सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ चित्रपटातील त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सैफ या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
क्रितीने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बरेली की बर्फी’, ‘दिलवाले आदींसह अनेक चित्रपटात दिसली असून लवकरच ती ‘आदिपुरुष’सह ‘हम दो हमारे दो’ चित्रपटात झळकणार आहे. मात्र तिच्या फोटोवर चांगल्याच प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- काय फालतूपणा…! राज्यसरकारच्या ‘त्या’ निर्णयावर आरोह वेलणकर भडकला
- ‘आता हा घोटाळा उघड करा’; संजय राऊतांचं सोमय्यांना ओपन चॅलेंज
- ‘मोदी सरकारचे १०० कोटी आणि ठाकरे सरकारचे १०० कोटी किती फरक आहे पाहा’
- रितेश देशमुख सुध्दा झाला होता बेरोजगार; धक्कादायक खुलासा…!
- आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

