चेन्नई : आयपीएल स्पर्धा सुरु होउन दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. शुक्रवारी चेन्नई येथे होणाऱ्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स दोन संघात सामना होत आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने २ तर पंजाबने एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाब संघाला मागील सलग तीन सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले.
आजचा सामना क्रिकेटप्रेमीसाठी आणखी एका कारणासाठी खास आहे. कारण पंजाब संघाचा दीपक हुडा आणि मुंबईचा कृणाल पांड्या या दोघात जानेवारी महिन्यात वाद झाला होता. या वादानंतर दीपक हुडाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात जेव्हा दिपक हुडा आणि कृणाल पांड्या आमने-सामने येतील तेव्हा त्यांच्यातील होणारी लढत नक्कीच रंगतदार होईल यात शंका नाही.
कृणाल पांड्या हा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विशेष चमक दाखवु शकला नाही. त्यामुळे त्याला संघातुन बाहेर काढण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे दीपक हुडाने पंजाबच्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती. या खेळीत त्याने षटकारांची आतिषबाजी केली होती. त्या सामन्यात दीपकने ६४ धावांची वादळी खेळी केली होती. तर दुसरीकडे कृणालने पुर्ण स्पर्धेत केवळ २६ धावा करत गोलंदाजीत ३ गडी बाद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेळीच काँग्रेस नेत्यांचे सल्ले ऐकले असते तर देशाचे स्मशान झाले नसते – पटोले
- संचारबंदीनंतर लस न घेता फिरल्यास पाचशे रुपयांचा दंड!
- मौलाना वहीदुद्दीन यांचे निधन; संघ, मोदींनी व्यक्त केल्या संवेदना
- उस्मानाबाद जिल्ह्यात बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा
- महाराष्ट्राच्या मदतीसाठी गडकरींचा पुन्हा पुढाकार; आंध्र प्रदेशकडून मिळणार ३०० व्हेंटीलेटर्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

