Share

कोविड रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी प्रयत्न करावा- जिल्हाधिकारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पासोबतच गेवराई, चितेगाव व शेंद्रा याठिकाणी असलेल्या एकूण सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी (दि.२४) भेटी दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्रकल्पामधून एकूण १० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना मदत व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच कोविड रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे अशा सूचना सर्वांना केल्या.

जिल्ह्यातील गरजू कोविड रुग्णास ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता पडू दिली जाणार नाही. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे संपूर्ण सहकार्य प्रशासनास आहे. आवश्यक असलेल्या व उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची तपासणी आणि निर्मितीमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेटी दिल्या. यावेळी संबंधित यंत्रणेला ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णास वेळेत आणि समन्वयाने करावा अशा सूचना यावेळी संबंधित अधिकारी व यंत्रणेला केल्या.

रुख्मिनी मेटल्स ॲण्ड गॅसेस लिमिटेड गेवराई येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट दिली. यावेळी रुख्मिनी मेटल ॲण्ड गॅसेस प्रकल्पाचे शाखा व्यवस्थापक आर.के.चोप्रा यांनी या प्रकल्पातील उपलब्ध ऑक्सिजन साठा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीची माहिती दिली. यानंतर चितेगाव येथील आर.एल.स्टील ॲण्ड एनर्जी यांच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट देऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मितीसाठी या प्रकल्पाचे सहकार्य असून जिल्ह्यातील गरजू रुग्णांस ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चोवीस तास तत्पर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांना दिल्या.

रुग्ण संख्या भविष्यात वाढली तर योग्य नियोजन करुन सर्व प्रकल्पाची क्षमता, निर्मिती आणि जिल्ह्यातील रुग्णालयांची मागणी यासाठी समन्वय योग्य राखावा अशा सूचना नोडल अधिकारी तसेच या प्रकल्पांना वेळोवळी अपडेट माहिती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पास भेटी दरम्यान दिल्या. त्यानंतर शेंद्रा एमआयडीसीतील सृशील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व स्टरलाईट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प यांना भेटी देऊन उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची पाहणी केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!