नवी दिल्ली : राज्यासह देशात मागील वर्षापासून कोरोनाचा धोका आहे. कोरोना कोरोना महामारीत अनेकल लोकाना आपला जीव गमवा लागला. तसेच या कोरोनाच्या संकटामुळे देशाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. याच काळात अनेक लोक बेरोजगार झाले असे एक ना अनेक संकटाचा सामना लोकांना करावा लागल्याने सर्वचजण चिंतेत आहे. परंतु कोरोना विषाणूवर आलेल्या एका नव्या रिपोर्टमुळे जगातून कोविड १९ आजार पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकतो असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आल्याने यामुळे नक्कीच दिलसा मिळू शकतो.
ब्रिटीश मेडिकल जर्नल ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण नष्ट करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे. या स्टडीत १७ फॅक्टर असून याद्वारे कोरोना संक्रमण पसरले जाऊ शकणार नाही. त्याचसोबत कोविड १९ रोखण्यासाठी ज्या पद्धती सांगितल्या आहेत त्याबाबतही रिपोर्टमध्ये अचूक सांगण्यात आलं आहे.
या १७ फॅक्टरमध्ये तंत्रज्ञान विकास, सुरक्षता, प्रभावी लसीकरण आणि दिर्घकाळ इम्युनिटी कायम राखण्याचे फॅक्टर्स सांगितले आहेत. त्याशिवाय सामाजिक, राजकीय आणि आर्थिक फॅक्टर्सचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यात सरकारने प्रभावी निर्बंध आणि लोकांद्वारे संक्रमण थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ते समजून पडताळणी करण्यात आली आहे. हे सर्व फॅक्टर्स तीन केंद्र बिंदू प्रणालीवर रेटिंग केले आहे. ही प्रणाली विकसित केल्यानं कोविड १९ नष्ट होणार की नाही हे लक्षात येऊ शकते. आतापर्यंत फक्त स्मॉलपॉक्सआणि पोलिओ या व्हेरिएंटवर असं यश मिळालं आहे.
रिपोर्टमध्ये असं आढळलं की, स्मॉलपॉक्स आणि पोलिओच्या तुलनेत कोविड १९ संपुष्टात आणणं खूप सोप्पं आहे. रेटिंगनुसार, स्मॉलपॉक्सचा स्कोअर २.७, कोविड १.६ तर पोलिओ १.५ आहे. आमची गणना प्राथमिक स्वरुपातील आहे. ज्यात अनेक फॅक्टर्सचा विचार करण्यात आला आहे. कोविड १९ ला जगातून नष्ट करता येऊ शकते परंतु त्यासाठी कठीण प्रयत्न करावे लागतील तेदेखील अनेक वर्षासाठी असावेत.
कोविड १९ ला संपुष्टात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक गुंतवणूक आणि सुरक्षा. जर हे ३ फॅक्टर्स एकत्र आले तर कोविड १९ रोखू शकतो, मात्र हे सोप्पं नाही. कारण लॉग्न कोविडची समस्या कायम आहे. म्हणजे कोविड संक्रमणातून बरे होऊनही लोकांमध्ये कोविडची लक्षणं आढळून येत आहेत.
स्मॉलपॉक्स, पोलिओच्या तुलनेत कोविड १९ लसीबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. जे जास्त धोकादायक आहे. वॅक्सिन न लावण्याच्या गोंधळामुळे व्हेरिएंटसचा धोका वाढू शकतो. त्याचसोबत सर्वात मोठे आव्हान आहे की, लसीकरण आणि आरोग्य सुविधेत अत्याधुनिक आणि प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी निधीची आवश्यकता भासेल. नवीन लसींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे. याठिकाणी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात ; आयसीसी क्रमवारीत घसरण
- ‘व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर’, ‘यामुळे’रात्रभर झोपू शकले नाही
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- आम्ही ‘या’ विधेयकाला समर्थन देतोय, पण… – संजय राऊत
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
