Share

सरकारची चर्चेसाठी तयारी,वेळ आणि तारीख सांगावी; सरकारचं शेतकऱ्यांना आणखी एक पत्र

Published On: 

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांवरुन शेतकरी संघटना आणि सरकारमधील वाद अद्याप कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत सरकारने गुरुवारी चर्चेसाठी नवीन निमंत्रण पाठविले.

नवे कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीबाबत लेखी हमी हेच सरकारसोबतच्या चर्चेचे प्रमुख मुद्दे असतील असं शेतकरी आंदोलकांच्या संघटनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. यावर आता केंद्र सरकारनेही शेतकरी संघटनांना लेखी उत्तर दिलं आहे.शेतकरी संघटनांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व मुद्द्यांवर बोलण्याची आणि त्यावर समाधानकारण तोडगा काढण्याची केंद्र सरकारची तयारी आहे असं उत्तर केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना दिलं आहे.

शेतकरी संघटनांनी वेळ आणि तारीख निश्चित करावी यासोबतच पत्रात नमूद केलेल्या विषयांव्यतिरिक्त आणखी काही मुद्दे असतील तर तेही सांगावेत. सरकारची चर्चेसाठी तयारी आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेसाठीचं आवाहन केलं आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी केंद्र सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत तर्कसंगत चर्चेसाठी सरकार तयार आहे’, असं विवेक अग्रवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सुरु असताना दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते. पीएम किसान योजना लाँच केल्यानंतर मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा माहिती दिली आहे. देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल. दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 कोटी रुपयांची रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत. या निमित्तानं शेतकरी बांधवांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!