Share

कोल्हापूरचा पठ्ठया आंतरराष्ट्रीय टॅक्सेशन परीक्षेत देशात अव्वल !

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, पैलवानांचा आणि खाद्य संस्कृतीचा वारसा लाभला आहे. तांबड्या मातीतून देशभरात कोल्हापूरचा डंका गाजवणाऱ्या मल्लांची जडणघडण या जिल्ह्यात झालेली आपण पाहिलं आहे. मात्र, इतर क्षेत्रात देखील कोल्हापुरातील तरुण पिढी भरीव कामगिरी करताना दिसत आहे.

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापुरातील तरुण चार्टर्ड अकाऊंटंट रजत संभाजी पोवार याने इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत भारतात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. रजत पवार हा मूळचा कोल्हापुरातील उचगाव येथील असून सद्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे कुटुंब राजारामपुरी भागात वास्तव्यास आहे.

तरुण वयात त्याने संपादन केलेल्या या यशाचे चांगलेच कौतुक होत आहे. त्याचे वडील देखील प्रसिध्द चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात डायनॅमिक बदल होत असून बदलांना सतत सामोरे जात आंतरराष्ट्रीय करप्रणालीचा अभ्यास रजतने केला आहे. दहावी व बारावीमध्ये चांगलं यश संपादन केल्यानंतर त्याने बीकॉम करण्याचे ठरवले. यावेळीच त्याने चार्टर्ड चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा संकल्प केला होता.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच रजत चार्टर्ड अकौंटट झाला. त्यानंतर त्याने इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जगभरातील प्राप्तिकर प्रणालीमध्ये कोठे काय बदल होत आहेत, याचा सूक्ष्म अभ्यास त्याने केला. नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन करत भारतात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. यासंदर्भात सकाळने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!