पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. याशिवाय हिंदू धर्मियांचा,भारतीय संघराज्याचा,न्यायपालिकेचा अवमान करणारी अनेक वक्तव्ये त्याने केली आहेत. देशभरातून या गोष्टीचा निषेध नोंदविला जात आहे.
दरम्यान, यावरून काल भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला होता. आज हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी यांना तातडीने अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी पुणे शहर भाजपच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे पोलीस कमिशनर ऑफिस येथे आज निवेदन देण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहळ, शहर अध्यक्ष जगदिश मुळीक,आ मुक्ता टिळक, भिमराव तापकीर, प्रदिप रावत, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.यावेळी शरजिल वर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, शर्जील उस्मानी याच्यावर दाखल झालेला गुन्हा पुरेसा नाही. त्याचे वक्तव्य देशविरोधी आहे. समाजात दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याला त्वरित अटक करण्यात यावी. यासोबतच ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु हे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी; मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही’
- गंभीरच्या संभावित खेळाडू संघात हार्दिकसह या अनुभवी खेळाडूंना स्थान नाही ?
- अभिमानास्पद : नासाची दोर आता भारतीयाच्या हातात, भव्या लाल यांची कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती
- शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल
- नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरीक्त मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
