Share

‘सोमय्यांना कोल्हापुरी हिसका दाखवणार; कदाचित त्यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल’, राष्ट्रवादीचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

यातच सोमय्या यांनी सोमवारी (दि. २०) घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्हापूरकरांना आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा दिली तरी कोल्हापूरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

‘मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ स्टंट आहे. हिंमत असेल तर सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. सोमय्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि रुग्ण कागलमध्ये जमत आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान त्यांनी दिले.

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने पत्रकार परिषदेत म्हणाले की, सोमय्या यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. तरीही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी? सोमवारी सकाळी दहा वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तीस हजारांवर जनता जमणार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे. कारखान्याचे ४० हजार सभासद शेतकऱ्यांची ते साखर बंद करू पाहत आहेत. हे कशाचे द्योतक आहे?’

तसेच ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, ‘प्रतिकूल परिस्थितीतून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी झाली आहे. ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून सभासदत्व घेतले. बिनबुडाचे व सनसनाटी आरोप, वक्तव्ये करून स्टंटबाजी करायची, हा सोमय्या यांचा छंदच आहे. कदाचित, सोमय्यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल’ असा इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!