औरंगाबाद : दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीवर १९८७ साली जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा आजूबाजूने फुटल्यामुळे एका शेतकऱ्याची मातीसह शेती आणि नदीच्या फुगवट्याचे पाणी शेतात पसरल्याने किमान शंभर एकरावरील पिके नेस्तनाबूत झाले आहेत.
कोल्हापुरी बंधाऱ्यालगत असलेल्या चिंचखेडा येथील पूर्णा नदीच्या पश्चिम भागातील गट नंबर १९५ मधील त्रिंबक गाड़ेकर, विष्णु गाडेकर, शिवाजी कळम यांच्या शेतातील नदीच्या काठावरील जवळ पास एक एकर जमीन वाहून गेली. बंधाऱ्याच्या पूर्वेस भवनच्या हद्दीत असलेल्या भागातील तर गट न ९ मधील फकिरचंद कळम यांची सोयाबीन, रामराव कळम यांची मका, व गणेश कळम, सुभाष कळम यांचे संपूर्ण पिके भुई सपाट झाले आहेत. या बंधाऱ्यास पाणी अडविण्यासाठी प्लेट टाकल्यामुळे पाणी अडवले गेले आणि पाण्याचा फुगवटा आजूबाजूच्या शेतातुन वाहिल्यामुळे उभे पीक खराब झाले आहेत.
दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतक-यांनी सिल्लोड तहसीलदारांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने पथक पाठवून पंचनामा केला आहे. या आपत्तीमुळे हवालदिल शेतकरी लवकरच आंदोलनाचे हत्यार उपासनार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचा विरोध असतांना देखील सिद्धेश्वर कारखान्याची अर्कशाळा (डिस्लरी) भाडेतत्वावर चालवणाऱ्या स्टार केम इंडस्ट्रीज या कंपनीच्या कर्मचाऱ्यानी पाणी अडविण्यासाठी या कोल्हापुरी बंधाऱ्यावर दरवाजे बसवले असा आरोप करून कंपनीवर कठोर कारवाईची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील प्रकल्पांचा मार्ग मोकळा; सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी
- जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पूर आला असं म्हणणं हास्यास्पद; चंद्रकांत पाटलांचा टोला
- १० ऑक्टोबरला होणार यूपीएससी पूर्व परीक्षा, औरंगाबादेत ४७ केंद्र जाहीर
- अभिमानास्पद ! हवाई दल प्रमुखपदी मराठमोळ्या व्ही आर चौधरी यांची वर्णी
- ‘बळीराजा हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब त्याला चिंतामुक्त कधी करणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

