मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवाराकडे बोट दाखवत आहेत. जलयुक्तच्या कामामुळे नद्यांशी मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे.
देऊळगावकर म्हणाले, जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान याच मुद्द्याला धरून आता भाजपला त्यांच्या विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘मराठवाड्यातील आजची परीस्थिती हि जलयुक्त शिवारच्या तांत्रिक अडचणीमुळे उद्भवली नाही. किंबहुना या महापुरामुळे पिकांचे जरी नुकसान झाले असले तरी या पावसाच्या निमित्ताने जलयुक्त शिवाराची झालेली कामे किती उपयुक्त आहेत हे समजते.
तसेच जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पाण्याचा साठा होत आहे, या साठवलेल्या पाण्याचा दुष्काळात पिकांना वापर करता येतो. यामुळे जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पूर आला असं म्हणणं हास्यास्पद आहे. नदीपात्रातील बांधकामे हा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींना मागास ठेवण्याचा आरएसएसने विडा उचललाय!’
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


