Share

‘बळीराजा हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब त्याला चिंतामुक्त कधी करणार?’

Published On: 

मुंबई : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावंच्या गावं पाण्यात गेल्याने अनेक संसार देखील उद्ध्वस्त झाले आहेत.

यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे. राज्यातला शेतकरी हंबरडा फोडत आहे. त्याचे संपूर्ण शेत पाण्याखाली गेले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

‘शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशी एका मागोमाग संकट येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, याशिवाय काही एक बोलत नाहीये. महापुरातल्या आणि चक्रीवादळातील शेतकऱ्यांना ठाकरे सरकार कोणत्याही प्रकारची मदत देऊ शकले नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण राज्य सरकार आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे अशी टीका सदाभाऊंनी केली.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. सरसकट पंचनामे करा, सरसकट विम्याचे पैसे द्या. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज तातडीने माफ करा. बागायती शेतकऱ्यांना आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!