टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर – सांगलीच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे. तर काही शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवर होत आहे. त्यावरून राज्य शासनाने कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामध्ये खरीप २०१९ हंगामातल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येणार असल्याचं सांगितल आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कर्ज माफी बाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरग्रस्त बाधीत शेतकऱ्यानं नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. पिकांच्या पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. तर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून ऊसाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर याचा फटका ऊस कारखान्यांना देखील बसणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
- ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भावी विरोधीपक्ष नेत्याचे गुण दिसतात’
- महाजनादेश यात्रेतील मेटें सोबतच्या वादावर पंकजा मुंडे म्हणाल्या…
- महिलांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- आर्थिक मंदीबाबत राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
