Share

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली मात्र प. महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांनी प्रशासनाची चिंता वाढवली

Published On: 

 कोल्हापूर – राज्यात काल नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजारानं कमी झालेली आढळली. काल राज्यात 8 हजार 535 नवीन कोरोनाबाधित आढळले तर 6 हजार 13 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 96.2 टक्के झालं आहे.

राज्यात कोविड-19 मुळे काल 156 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातला मृत्युदर आता 2.4 टक्के आहे. सध्या 1 लाख 16 हजार 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 59 लाख 12 हजार 479 झाली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात काल 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!