आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सामन्यात पंजाबने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ११ वे षटक टाकायला हरप्रित ब्रार आला होता. हरप्रितने या षटकातील पहिल्या चेंडूवर विराटला ३५ धावांवर त्रिफळाचीत केले. विराट कोहली हा हरप्रीतची आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट ठरला. सामना संपल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हरप्रित ब्रारला भेटायला गेला. विराटने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी कोहलीचे कौतुक केले आहे.
First, the wicket & then, the appreciation from the man himself! ????@thisisbrar will surely cherish this moment with @imVkohli! ????#VIVOIPL #PBKSvRCB pic.twitter.com/ovXmadbyKN
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
या सामन्यात पंजाब संघाने तीन बदल केले होते. मंयक अग्रवाल, अर्शदिप सिंग आणि मोझेस हेन्रिक्स यांना संघाबाहेर करत प्रभसिमरण सिंग, रिले मेरीडिथ आणि हरप्रीत ब्रार यांना संधी दिली. यात हरप्रित बारने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चमक दाखवली. फलंदाजी करताना हरप्रीत ब्रारने कर्णधार के एल राहुलसोबत महत्वाची ६१ धावांची नाबाद भागीदारी केली. यावेळी त्याने १७ चेंडुत १ चौकार आणि २ षटकारासह २५ धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी करताना त्याने आरसीबीचे महत्वाचे तीन खेळाडू कोहली, मॅक्सवेल आणि एबी यांना बाद करत आरसीबीला बॅकफुटवर ढकलले.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय संघाचा हुकमी एक्का आर अश्विनच्या कुटुंबात कोरोनाचं थैमान
- महाराष्ट्र दिनी मुंबई इंडियन्स विजयाची पताका फडकवणार का?,आयपीएलमध्ये आज हिटमॅन विरुद्ध चेन्नई एक्सप्रेस
- राज्यात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायेत
- बलाढ्य आरसीबीचा पंजाब किंग्सकडून ३४ धावांनी दारुण पराभव
- गुजरातमध्ये अग्नितांडव! हॉस्पिटलला आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू


