🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी एक्का आर. अश्विनच्या कुटुंबावर सध्या कठीण परिस्थिती ओढावलीय. अश्विनच्या कुटुंबातील १० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट यामध्ये ४ लहान मुलांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली कठीण परिस्थिती सांगितली आहे. तसंच काळ कठीण असल्याचं सांगत प्रत्येक जणाने आपल्यासहित आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
https://twitter.com/prithinarayanan/status/1388147885993185280?s=20
आर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. ‘एका आठवड्यापासून आमच्या कुटुंबातील ६ मोठे तर ४ मुलं अशा १० जणांना मिळून कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’ कोरोनाच्या या महासंकाटत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन देखील आर अश्विनच्या पत्नीने केलं आहे. कोरोनाची लस घेण्याचं आवाहन देखील ट्वीटमधून केलं आहे.
https://twitter.com/prithinarayanan/status/1388152134818955267?s=20
पाठीमागील आठवड्यात अश्विनच्या कुटुंबाताील १० लोकांना कोरोनाचा संसर्ग जडला. मागील आठवड्यापासून कुटुंबातील लोक कोरोनाशी दोन हात करतायत. कुटुंबीयांच्या चिंतेने अश्विनने रविवारी आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. माझं कुटुंबीय कोरोना सारख्या जागतिक संकटाचा सामना करत असताना मी त्यांच्यासोबत असायलं हवं, असं म्हणत त्याने आयपीएल २०२१ ची स्पर्धा अर्ध्यावरच सोडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायेत
- गुजरातमध्ये अग्नितांडव! हॉस्पिटलला आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
- शिवभोजन थाळीबाबत भातखळकरांना नेमके काय म्हणायचे आहे?
- धुळे – सोलापूर रस्त्याचे कामे गुणवत्तापूर्वक, वेळेतच पुर्ण करावेत : जिल्हाधिकारी चव्हाण
- रिलायन्स इंडस्ट्रीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ, गेल्या आर्थिक वर्षात ३४.८ टक्के जास्त नफा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
