🕒 1 min read
दिल्ली : आयपीएलमध्ये दिल्ली येथे आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन बलाढ्य संघात सामना होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकत महेंद्रसिंह धोनीची चेन्नई एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. तर अडखळीत सुरुवातीनंतर मुंबईच्या संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतला आहे.
मागील वर्षीच्या अपयशानंतर चेन्नईच्या संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धडाकेबाज कामगीरी करत सर्व प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले आहे. सलामीच सामना दिल्ली विरुद्ध गमावल्यानंतर चेन्नईच्या संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे. स्पर्धेत अजिंक्य असलेल्या आरसीबी संघावर चेन्नईने दणदणीत विजय मिळवत विरोधी संघाना इशारा दिला की त्यांना रोखणे शक्य नाही. चेन्नईचे सलामीवीर गायकवाड-प्लेसिस आणि मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना, मोईन अली , अंबाती रायडू सर्व चांगली कामगीरी करत आहे. तर अष्टपैलु रविंद्र जडेजा हा भन्नाट फार्मात आहे. गोलंदाजीतही चेन्नईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी बळी मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
तर गतविजेता मुंबई इंडियन्सची या स्पर्धेतील वाटचाल ही अडखळत झाली आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर सलग दोन सामने जिंकत मुंबईने दमदार पुनरागमन केले. पण त्यानंतर पुन्हा सलग दोन पराभव स्विकारावा लागल्याने संघ अडचणीत सापडला आहे. हार्दिक पांड्या सातत्याने अपयशी होत असल्याने त्यांला आजच्या सामन्यात संधी मिळेल का हा प्रश्न आहे. कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज कामगीरीत सातत्य दाखवु शकले नाही. तर गोलंदाजीत सर्व गोलंदाज चांगली कामगीरी करत आहे. मात्र फलंदाजाच्या अपयशामुळे सामने गमावले आहे. मात्र मागील सामन्यात राजस्थानवर सहज विजय मिळवत मुंबईने पुनरागमन केले. सलग पाच विजय मिळवत सुसाट चेन्नईची विजयी घोडदौड फक्त मुंबईच रोखु शकते असे मुंबईच्या चाहत्यांने मत आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर चेन्नईवर मात करुन मुंबई विजयी पताका फडकावेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करतायेत
- बलाढ्य आरसीबीचा पंजाब किंग्सकडून ३४ धावांनी दारुण पराभव
- गुजरातमध्ये अग्नितांडव! हॉस्पिटलला आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
- एसडीआरएफ मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांना होणार मदत
- शिवभोजन थाळीबाबत भातखळकरांना नेमके काय म्हणायचे आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
