Share

गुजरातमध्ये अग्नितांडव! हॉस्पिटलला आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

सुरत : गुजरातमधील भरुच याठिकाणी असणाऱ्या पटले वेलफेअप हॉस्पिटल मध्ये रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली आहे. याठिकाणी कोव्हिड सेंटर बनवण्यात आलं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं, त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी या घटनेमध्ये चौदा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अशा काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये भंडारा, भांडुप, नालासोपारा, नागपूर याठिकाणी रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटना ताज्या असतानाच आता गुजरातमधून देखील आगीची घटना समोर येते आहे. भरुच याठिकाणी हे अग्नितांडव घडलं असून यात १४ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री१२:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या       

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!