Share

बलाढ्य आरसीबीचा पंजाब किंग्सकडून ३४ धावांनी दारुण पराभव

Published On: 

🕒 1 min read

आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजीसाठी पंजाबच्या संघाला पाचारण केले. तिसऱ्याच षटकात पदार्पण करणाऱ्या प्रभसिमरण सिंगला जेमीन्सनने बाद करत आरसीबीला पहिले यश मिळवुन दिले. यानंतर कर्णधार के एल राहुल(९१) आणि ख्रिस गेल(४६) यांनी ८० धावांची भागिदारी करत पंजाबचा डाव सावरला. गेल बाद झाल्यानंतर पुरन(०), दीपक हुडा(५) आणि शाहरुख खान(०) लवकर बाद झाल्याने पंजाबचा संघ अडचणीत सापडला. यावेळी पदार्पण करणारा हरप्रीत ब्रार(२५) सोबत के एल राहुलने ६१ धावांची नाबाद भागीदारी करत पंजाबच्या संघाला १७९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पंजाबकडून कर्णधार के एल राहुलने सर्वाधिक ५७ चेंडुत ७ चौकार आणि ५ षटकारासह नाबाद ९१ धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

दुसऱ्या डावात पंजाबने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने आपला पहिला गडी पडिक्कलच्या(७) रुपात तीसऱ्याच षटकात गमावला. यानंतर कर्णधार कोहली(३५) आणि रजत पटीदार(३१) यांनी आरसीबीचा डाव सावरला. यानंतर नवोदीत हरप्रीत ब्रारने कर्णधार कोहली, ग्लेन मॅक्सवेल(०) आणि धोकादायक एबी डिव्हीलीयर्स(३) ला बाद करत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. याधक्यातुन आरसीबीचा संघ सावरु शकला नाही आणि निर्धारित २० षटकात आरसीबीचा संघ केवळ १४५ धावापर्यंत मजल मारता आली. यामुळे पंजाब किंग्सने ३४ धावांनी विजय मिळवला. कर्णधार कोहलीने आरसीबीकडुन सर्वाधिक ३४ चेंडुत ३ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!