Share

डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात कोहलीकडे ‘हा’ विश्वविक्रम नोंदवण्याची संधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या २ वर्षापासुन विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक झळकावले नाही. डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपुष्टात येईल अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे. जर विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावले तर कर्णधार म्हणून विराटचे हे ४२वे शतक ठरेल. यासह कर्णधार म्हणून विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक शतके झळकावणारा कर्णधार ठरेल.

विराट कोहलीने अखेरचे शतक हे २०१९ मध्ये बांग्लादेश संघाविरुद्ध झळकावले होते. डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात जर विराटने शतक झळकावले तर तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकू शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रिकी पॉंटिंग आणि विराट कोहली यांच्या नावे ४१-४१ शतक आहेत. डब्ल्युटीसी स्पर्धेत विराट कोहलीने एकूण १४ सामने खेळले आहेत. स्पर्धेत त्याने ४३.८५ च्या सरासरीने ८७७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!