Share

कसोटी महाभारत! अंतिम लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा

Published On: 

मुंबई : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना दोन दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.

बीसीसीआयने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे कर्णधारपद विराट कोहली आणि उपकर्णधारपद अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. सलामीसाठी रोहित शर्माच्या सोबतीला शुभमन गीलचा समावेश केला आहे. मंयक अग्रवालचा सलामीवीर म्हणून पत्ता कट झाला आहे. तिसऱ्या क्रंमाकावर फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा संघात कायम आहे. त्याच्या सोबतीला फलंदाज हनुमा विहारीचा समावेश संघात करण्यात आला. यष्टीरक्षक म्हणून भारताने रिषभ पंत आणि वृद्धीमान साहा दोघांची निवड झाली आहे.

या संघात फिरकीपटु म्हणून आर अश्विन हा एकमेव खेळाडु आहे. त्याच्या सोबतीला अष्टपैलु रविंद्र जडेजाचा समावेश संघात करण्यात आला आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या अनुभवी गोलंदाजचा समावेश केला आहे. तर यांच्या साथीला नवोदीत मोहम्मद सिराजचा समावेश संघात करण्यात आला आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!