Share

WTC च्या फायनलमध्ये कोहलीकडे ‘या’ माजी दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

Published On: 

इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर 26 धावांच्या आत टीम इंडियाने तीन गडी गमावले.

रोहित, शुबमन आणि चेतेश्वर पुजारा यांना लवकर बाद केल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. भारतीय संघाच्या तीन विकेट 88 धावांवर घेतल्या होत्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पुढाकार घेतला. कोहली आणि रहाणेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोहलीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक 41 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. विराटच्या नावावरही एवढीच शतकं आहेत. त्यामुळे या सामन्यात शतक केलं तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!