Share

पंतच्या षटकाराची कोहलीसह क्रिकेटप्रेमींनाही भुरळ

Published On: 

मुंबई : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.

दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मारलेल्या एका उत्तुंग षटकाराने कोहलीलाही भुरळ पाडली आणि त्याने खास अंदाजात पंतची पाठ थोपटली. इंग्लंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट आणि इशान मैदानावर टिकून होते. त्यांच्यातील शतकी भागिदारी पूर्ण होण्यासाठी अवघ्या ६ धावांची आवश्यकता होती. अशात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिदने इशानला पायचित करत त्यांची भागिदारी तोडली. त्यानंतर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

https://twitter.com/gupta_ritikaa/status/1371145288648290305?s=20

पंतने आक्रमक पवित्रा घेत मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी करत २६ धावांची छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळी केली. यादरम्यान डावातील १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंतने जबरदस्त शॉट मारला. पंतच्या या ९० मीटर अंतरावर गेलेल्या खणखणीत षटकाराला पाहून नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला कर्णधार कोहली भलताच खुष झाला. त्याने जाऊन पंतला मिठी मारली आणि शाबासकी दिली. पंत आणि विराटचा हा मिठी मारल्याचा फोटो भारतीय क्रिकेटप्रेमींना खूप आवडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!