🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता दिल्ली आणि मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी अंतिम सामना होणार आहे. आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात पाहिले तर, दिल्लीची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली असतानाच विराट कोहलीच्या आरसीबी संघाला मात्र प्ले-ऑफ गाठल्यानंतर एलिमिनेटर-१ मध्ये प्रभाव पत्करून शेवट करावा लागला होता. त्यामुळे यंदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न बंगळुरूला पूर्ण करता आलं नाही. यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आता विराट कोहलीच्या पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं रोखठोक मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त करत कोहलीला लक्ष्य केलं होतं.
“आठ वर्ष एका टूर्नामेंटमध्ये, आणि एकही ट्रॉफी नाही, आठ वर्ष हा खूप मोठा काळ झाला. मला एक कर्णधार सांगा, कर्णधार सोडा, एखाद्या खेळाडूचे नाव सांगा, ज्याला आठ वर्ष मिळाली, पण विजेतेपद न मिळूनही त्याला कायम ठेवण्यात आले. कर्णधाराने जबाबदारी घ्यायला पाहिजे” असा घणाघात गंभीरने केला होता.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने मात्र विराट कोहलीच्या पाठीशी उभं राहत त्याचं समर्थन केलं आहे. ‘पुढच्या वर्षीही कर्णधारपदाची धुरा कोहलीकडे सोपवण्यात हरकत नाही. तर, ‘माझ्यामते फिनिशर्सची संघाला गरज असल्यामुळे युवा खेळाडूंचा शोध घेत संघाची ताकद वाढवण्यावर भर देणे योग्य राहील,’असे सेहवाग म्हणाला.
‘कर्णधार हा संघाची जबाबदारी सांभाळणारा नेता असतो.तो देशाचे नेतृत्व करीत असताना निकाल देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो. वन डे टी-२० आणि कसोटी सामने जिंकण्यात विराटने मोलाचे प्रयत्न केलेले आहेत. तथापि आरसीबीचे नेतृत्व करताना विराटला कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पहायला मिळाले आहे.
कामगिरी उंचावण्यासाठी कर्णधाराकडे चांगला संघ देखील असणे महत्त्वाचे ठरते.त्यामुळे आरसीबी व्यवस्थापन कर्णधारपदावरुन विराटची उचलबांगडी करण्यास बाध्य होणार नाही, असा मला विश्वास वाटतो. त्यापेक्षा बळकटी आणण्यासाठी युवा फिनिशर्स संघात कसे आणता येतील,याकडे लक्ष द्यायला हवे. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या संयुक्त प्रयत्नातून पुढील सत्रात आरसीबीला घवघवीत यश मिळू शकेल,’ असा विश्वास वीरूने व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्राह्मण महासंघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खडसेंवर आली दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’
- ‘महाराष्ट्र सरकार नाकर्ते, मूठभर पाण्यात जीव द्यावा’ ; राम कदम पुन्हा काडाडले
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- उच्च न्यायालयाने जामीन नाकारला, अर्णबचा कारागृहातील मुक्काम वाढला
- ‘प्रभू श्रीरामांनी रावणाचा जसा पराभव केला, तसाच करोनाचाही पराभव होणार’ – बोरिस जॉन्सन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
