मुंबई : काही दिवसांपूर्वीच प्रियांका (Priyanka Chopra) आणि निक जोनास सरोगसी पद्धतीने आई-बाबा झाले आहेत. सिंगल पॅरेंटच्या चर्चेत आता अभिनेता तुषार कपूरबद्दल (Tusshar Kapoor) चर्चा होत आहे. त्याने हा निर्णय कसा घेतला याबद्दल त्याच्या पुस्तकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान अभिनेता तुषार कपूर एक सिंगल फादर आहे. त्याने सरोगसी पद्धतीने वडील होण्याचा निर्णय कसा घेतला तसेच तुषार सध्या त्याच्या बॅचलर डॅड (Bachelor Dad) या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. या पुस्तकात त्याने त्याच्या सिंगल फादर होण्याचा प्रवास लिहिला आहे. अलिकडेच या पुस्तकाच्या निमित्ताने त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, वयाच्या ३० व्या वर्षाच्या आसपास असताना मी सिंगल फादर होण्याचा निर्णय घेतला. माझ्या या पुस्तकात ९ ते १० वर्षांचा माझा प्रवास आहे.

तुषार कपूरला तिरुपतीच्या एका ट्रिपमध्ये दिग्दर्शक, निर्माते प्रकाश झा यांची भेट झाली. त्यांनी या भेटीत त्यास एक कल्पना दिली आणि त्यानंतर लक्ष्यचं (Lakshya) (तुषारच्या मुलगचं नाव) त्याच्या घरात येण्याचा प्रवास सुरु झाल्याचं तुषार म्हणाला. तसेच प्रकाश झा (Producer Prakash Jha) यांनी तुषारला म्हणाले, तुझं लग्न झालं नाहीये म्हणून काय झालं? जर तुझी इच्छा असेल तर तू एकल पालकत्व नक्कीच स्वीकारु शकतोस. त्यानंतर त्यांनी माझी एका सिंगल पॅरेंटसोबत भेट घडवून दिली. त्यानंतर मी सिंगल पॅरेंट होण्याच्या निर्णयावर ठाम झालो,असं तुषारने भावना व्यक्त केल्या.
सुरूवातीस त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, हा मुद्दा खूप सेंसिटिव्ह असून त्यात गुप्तता पाळली होती. मात्र ज्यावेळी लक्ष्य घरात आला त्यावेळी सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. विशेष म्हणजे तुषारने त्याचा हा सगळा प्रवास त्याच्या ‘बॅचलर डॅड’ या पुस्तकात लिहिला आहे. लवकरच त्याचं हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. आता यामुळे सोशल मीडियावर प्रियंकानंतर तुषारच्या निर्णयाबद्दल कौतूक केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘हिंदुत्वाच्या गप्पा कसल्या मारता, औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही..’ फडणवीसांचा टोला!
क्रांती चौक ते गोपाल टी रस्त्याचे कायापालट होणार; आमदार संजय शिरसाट यांचा ग्रीन सिग्नल!
छोट्या कपड्यातील श्रीवल्ली फेम रश्मिका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले..
“मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

