नवी दिल्ली : आजकाल बदलत्या नियमामुळे क्रिकेट खेळणे सोपे झाले आहे. याचा फायदा बऱ्याचदा फलंदाजांना होताना दिसतो. यामुळे एकदिवसीय सामन्यात ३०० धावा संघांकडून सहज बनवल्या जातात. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने स्वतः ७२ बॉल मध्ये २३७ धावा केल्या आहेत. त्याच्या या धुव्वादार फलंदाजीची चर्चा सर्वदूर होत आहे.
विक्टोरियन प्रीमियर क्रिकेट या स्पर्धेत क्रिस देवलीस या खेळाडूने हि दमदार कामगिरी केली आहे. त्याने केवळ ७२ बॉलमध्ये २३७ धावा केल्या. ज्यात विशेष म्हणजे त्याने ४४ बॉलवर केवळ चौकार आणि षटकार लगावले आहे. त्याच्या या खेळीने संघाला ४४१ धावांच्या बलाढ्य लक्षवर नेऊन ठेवलं. ज्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ केवळ २०३ धावांवर गारद झाला.
https://twitter.com/MyCricketAus/status/1484764192574160896?s=20
क्रिसचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहिती अनुसार विक्टोरियन प्रीमियर क्रिकेटच्या इतिहासातला हा सहावा मोठा स्कोर होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘अटकेच्या भीतीपोटीच हेडगेवारांनी…’; नितीन राऊतांचे वादग्रस्त वक्तव्यं
- ‘हिंदुत्वाच्या गप्पा कसल्या मारता, औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही..’ फडणवीसांचा टोला!
- ‘किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्ल’; नवाब मलिकांचा खोचक टोला
- क्रांती चौक ते गोपाल टी रस्त्याचे कायापालट होणार; आमदार संजय शिरसाट यांचा ग्रीन सिग्नल!
- छोट्या कपड्यातील श्रीवल्ली फेम रश्मिका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले..


