Share

मोठी बातमी: शरद पवार देखील करणार अन्नत्याग!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे खासदार राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे.

विशेष म्हणजे, निलंबित खासदारांनी सोमवारपासून गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला होता. तर, कृषी विधेयकासह अन्य महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार करणार दिवसभर अन्नत्याग!

” राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढले. सगळ्या सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केलं. आपल्या मनातील भावना त्यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला.

सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत. यामुळे आता केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध कायम ठेवला असून या विधेयकाच्या राज्यसभेतील घडामोडींवेळी हजर नसलेल्या शरद पवार यांनी देखील आपली भूमिका जाहीर केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

काय आहे निलंबन प्रकरण?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे खासदार राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!