Share

आ.लहामटे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मूक मोर्चा!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या विरोधात खडकी बुद्रुक येथील एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.किरण लहामटे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असून असे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही.

असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी यांनी दिला आहे. या गुन्ह्याच्या निषेधार्थ काल अकोले शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते.

अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे शिपाई रामदास लखा बांडे यांना दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आ.लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सत्ताधारी व विरोधी कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू होती. त्यामुळे काल या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी संपतराव नायकावडी, सुरेशराव गडाख, पोपटराव दराडे, मारुती भांगरे, चंद्रभान नवले, विजय देशमुख, ईश्वर वाकचौरे, संदीप शेणकर, महेशराव वैद्य, अण्णा ढगे, संतोष परते, महिला अध्यक्ष स्वातीताई शेणकर, ज्येष्ठ नेते अरुण रूपवते, किसान सेल युवक अध्यक्ष जालिंदर बोडके, रामनाथ शिंदे, संकेत चौधरी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!