Share

पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या वनडेपूर्वी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. यानंतर क्रिकेट क्षेत्रातून बऱ्याच्या प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू मुहम्मद हफीजने न्यूझीलंड क्रिकेट संघाची खिल्ली उडवली. यालाच आता किवी क्रिकेटपटू मिचेल मैक्लेनघनने जोरदार रिप्लाय दिला. मात्र काही वेळातच त्याने हे ट्विट डिलीट केले.

न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानसाठी 50 पेक्षा जास्त कसोटी आणि 218 एकदिवसीय सामने खेळलेला मुहम्मद हफीज न्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्यामुळे नाराज आहे. हफिजने पाकिस्तानी इमिग्रेशनमधून जात असलेल्या चार्टर फ्लाईटवर दुबईला जाणाऱ्या न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आणि ट्विट केले, ‘ब्लॅककॅप्सला विमानतळावर सुरक्षितपणे येण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल पाकिस्तान सुरक्षा दलांचे आभार. त्याच मार्गावर आश्चर्य आणि तेच सुरक्षा दले आहेत, पण आज धोका नाही?’

jagran

यालाच उत्तर देताना न्यूझीलंडचा महान क्रिकेटपटू मिचेल मैक्लेनघन म्हणाला, “भाऊ, हे बरोबर नाही. खेळाडूंना किंवा बोर्डाला दोष देऊ नका. आमच्या सरकारला दोष द्या. त्यांनी हे काम केले (पाकिस्तान दौरा रद्द केला) फक्त त्यांना मिळालेल्या सल्ल्यानुसार. सर्व युवा खेळाडूंना खेळायचे होते. आणि  स्वतःला करायचे होते. त्यांच्याकडे पर्याय नव्हता.’ अशा आशयाचं ट्विट करत त्याने मुहम्मद हफीजला चोख प्रतिउत्तर दिल काही वेळातच त्याने ट्विट डिलीट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!